पवित्र शास्त्राची ओळख
₹350.00
पवित्र शास्त्राची ओळख
येणाऱ्या दिवसांमध्ये विश्वासणारे या नात्याने आपल्याला ठामपणे उभे राहता यावे यासाठी आपण देवाच्या वचनाच्या सत्यामध्ये मुळावलेले असणे महत्त्वाचे आहे. पवित्र शास्त्राचा व्यापक दृष्टीकोन माहीत असणे अगत्याचे आहे आणि प्रस्तुतचे अभिषिक्त पुस्तक वाचल्याने हे सहज शक्य होणार आहे.
पवित्र शास्त्राच्या ६६ पुस्तकांवरील दृष्टीक्षेपाच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्राच्या इतिहासातील जुन्या व नव्या करारादरम्यानच्या काळावरही थोडक्यात भाष्य दिलेले आहे. डॉ. बेली हह्यांनी प्रत्येक अभ्यासात मुख्य मुद्दे तपशीलाने मांडले आहेत आणि त्यांच्या अफाट अनुभवातून अनेक अद्भुत गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या सुबक नीटनेटक्या पुस्तकातून तुम्हांला देवाच्या पुस्तकातील पानापानातून वाहणारी ठळक सत्ये सहजपणे आत्मसात करता येतील आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल.
देवाच्या वचनाचे सखोल ज्ञान आणि माहिती यांद्वारे तुमच्या जीवनासाठीच्या प्रभूच्या योजना व उद्देश तुम्ही जाणून घेत असताना सदर पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचे ठरावे हीच आमची प्रार्थना आहे.
डॉ. ब्रायन जे. बेली हे सध्या झायन फेलोशिप इंटरनॅशनल, झायन मिनिस्टेरीयल इन्स्टिट्यूट आणि झायन युनिव्र्व्हसिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गेल्या ५० वर्षांतील सेवाकार्यात त्यांनी सुमारे १०० हून अधिक देशांना भेटी दिल्या आणि त्यांच्या ह्या भेटी आशीर्वादाच्या ठरल्या. त्यांनी ४० हून अधिक ख्रिस्ती पुस्तके लिहिली. त्यातून त्यांनी विश्वासणाऱ्यांना देवाच्या मार्गाचे शिक्षण दिले आणि त्यांना आध्यात्मिक सीनाय पर्वताकडे जाणाऱ्या पवित्रतेच्या मार्गावर आणले.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.